इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 167 धावांचे आव्हान ठेवले होते. हेनरिक क्लासेनच्या १०४ धावांच्या शानदार शतकाने यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर आरसीबीने 20 व्या षटकात दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावा केल्या आणि आरसीबीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने फाफ डू प्लेसिससोबत 172 धावांची दमदार सलामी दिली. डु प्लेसिसने ७१ धावांचे योगदान दिले.
सामन्यानंतर या दोघांपैकी कोणाचे मोठे शतक होते यावर चर्चा सुरू झाली. यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने विराट कोहलीच्या शतकापेक्षा क्लासेनचे शतक जड असल्याचे मत व्यक्त केले.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना केविन पीटरसन म्हणाला, “मला एक कल्पना आहे. या दोन्हीमध्ये हेनरिक क्लासेनचे शतक सरस ठरले. क्लासेनची खेळी विराटपेक्षा सरस होती. त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. क्लासेन ज्या पद्धतीने खेळला तो अप्रतिम होता.”
हेनरिक क्लासेन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 51 चेंडूत 104 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादने केलेल्या 186 धावांमध्ये एकट्या क्लासेनने 104 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या 2 बाद 28 अशी होती. यानंतर क्लासेनने एकहाती डाव सांभाळला.
हैदराबादच्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी 172 धावांची सलामी भागीदारी केली. सलामीला आलेल्या विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावा केल्या. त्याला फाफ डू प्लेसिसने (71 धावा) चांगली साथ दिली. या दोघांमधील उत्तम भागीदारी असूनही हैदराबादने शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचून आणला. अखेरीस, आरसीबीने 4 चेंडू बाकी राखून सामना जिंकून त्यांचे प्ले-ऑफचे स्वप्न जिवंत ठेवले.
संबंधित बातम्या