जेतेपद पटकावल्यानंतर सीएसकेने तिरुपती मंदिरात ट्रॉफीची पूजा केली

सोमवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने गुजरात टायटन्सचा (GT) 5 गडी राखून पराभव केला आणि पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. आता मुंबई इंडियन्ससह CSK हा IPL इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला आहे.

ट्रॉफीसोबतच पिवळ्या जर्सीचा संघही चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला. चेन्नईने विजेतेपद पटकावल्यानंतर त्यागराजा नगर येथील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते आणि आयपीएल 2023 ट्रॉफीचीही पूजा करण्यात आली होती.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे अधिकारी मंदिराच्या पुजाऱ्यांना ट्रॉफी देताना दिसत आहेत. सीएसकेच्या या खेळीचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकात 4 विकेट गमावून 214 धावा केल्या. मात्र, पावसामुळे चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले होते, जे त्यांनी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर गाठले.

धोनीच्या प्रेमात रवींद्र जडेजा झाला भावूक – VIDEO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *