कर्णधार बाबर आझमला पाकिस्तानचा नंबर वन वनडे संघ बनवण्याचे बक्षीस मिळाले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्याला ऑक्टोबरमध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या ICC विश्वचषक 2023 पर्यंत कर्णधारपदी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानी न्यूज वेबसाईट GEO ने दिलेल्या माहितीनुसार, पीसीबी लवकरच घोषणा करेल की बाबर आझमला वर्ल्ड कपपर्यंत कर्णधारपदी कायम ठेवण्यात येईल.
विशेष म्हणजे, शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथमच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
PCB व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी ICC ODI क्रमवारीत प्रथमच प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पाकिस्तानी राष्ट्र, संघ, कर्णधार बाबर आझम आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
अशा गोष्टी प्रेरणा देतात, असे सांगत पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने आयसीसी वनडे क्रमवारीत प्रथमच प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल देशाचे आणि विशेषत: संघाचे अभिनंदन केले.
संबंधित बातम्या