बीसीसीआयने आयपीएल 2023 च्या प्ले ऑफची तारीख जाहीर केली, अंतिम सामना 28 मे रोजी खेळवला जाईल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या प्ले-ऑफच्या तारखा आज जाहीर केल्या आहेत. यासोबतच प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे ठिकाणही जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामातील प्ले-ऑफ आणि अंतिम सामने 23 मे ते 28 मे दरम्यान खेळवले जातील. चेन्नई आणि अहमदाबादमध्ये प्ले ऑफचे सामने होणार आहेत.

क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने 23 मे आणि 24 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवले जातील. यानंतर क्वालिफायर 2 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल आणि अंतिम सामना 28 मे रोजी होईल.

Leave a Comment