भुवनेश्वर कुमारने केली मोठी कामगिरी, आयपीएलमध्ये इतिहास रचला

सनरायझर्स हैदराबादचा (SRH) अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने इतिहास रचला आहे. भुवी इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात एका डावात पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या लीगमधील ३४व्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा संघासाठी आपली क्षमता सिद्ध केली. पहिल्या डावातील पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने आपल्या संघाला यश मिळवून दिले. याशिवाय या लीगमध्ये सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याच्या बाबतीतही भुवी दुसऱ्या स्थानावर आहे.

भुवीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हैदराबादसाठी गोलंदाजीची सुरुवात केली आणि पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर फिल सॉल्टला गोल्डन डकवर बाद केले. आयपीएलच्या पहिल्या षटकात भुवीची ही 23वी विकेट होती आणि लीगमधील एका डावात पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा तो गोलंदाज ठरला. या प्रकरणात ट्रेंट बोल्ट २१ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL च्या पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

23 विकेट – भुवनेश्वर कुमार

21 विकेट – ट्रेंट बोल्ट

15 विकेट – प्रवीण कुमार

13 विकेट – संदीप शर्मा

12 विकेट – झहीर खान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *