शनिवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 50 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा दिल्ली कॅपिटल्सने (DC) 7 गडी राखून पराभव केला. बेंगळुरूचे १८२ धावांचे आव्हान दिल्लीने १७ षटकांत सहज गाठले. दिल्लीसाठी स्टार यष्टीरक्षक फलंदाज फिलिप सॉल्टने एकहाती 87 धावांची दमदार खेळी खेळून सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला स्फोटक फलंदाज रिले रोसोची चांगली साथ मिळाली, ज्याने नाबाद 35* धावा केल्या.
आरसीबीने दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची दमदार सुरुवात झाली. सलामीवीर फिलिप सॉल्ट आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. यानंतर वॉर्नर २२ धावा करून बाद झाला. वॉर्नरनंतर आक्रमक खेळ दाखवणाऱ्या मिचेल मार्शने (26 धावा) सॉल्टला साथ दिली. दोघांनी दिल्लीला 10 षटकांत 119 धावांपर्यंत नेले. दरम्यान, सॉल्टने आपले अर्धशतक पूर्ण केले.
दिल्ली कॅपिटल्सच्या या विजयानंतर चाहते आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. स्पर्धेतील टॉप-10 ट्रेंडिंग मीम्स पहा –
संबंधित बातम्या