आयपीएल 2023 चा 34 वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (21), मिचेल मार्श (25), सरफराज खान (10), मनीष पांडे (34) याने 27 चेंडूत आणि अक्षर पटेलने 34 धावा करत दिल्लीचा स्कोअर बोर्ड 144 धावांपर्यंत नेला. निर्धारीत 20 षटकातच 144 धावा केल्या.
हैदराबादच्या गोलंदाजीत ताकद दाखवली.
सनरायझर्स हैदराबादकडून सर्वोत्तम गोलंदाजी पाहायला मिळाली, वॉशिंग्टन सुंदरने 4 षटकांत 28 धावांवर दिल्लीच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर याच भुवनेश्वर कुमारने चांगली गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 11 धावा देत दोन बळी घेतले. नटराजनलाही 3 षटकांत 21 धावा देऊन एक विकेट मिळाली.
हैदराबादच्या फलंदाजीत दम भरलेला दिसत होता
मयंक अग्रवालच्या 39 चेंडूत 49, हेनरिक क्लासेनच्या 19 चेंडूत 31 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या 15 चेंडूत 24 धावांच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने कमी धावसंख्येच्या सामन्यात 145 धावांचे आव्हान ठेवले. सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवू शकला नाही.
दिल्लीच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली
आज या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली, नोरखियाने 4 षटकात 33 धावा देत 2 बळी घेतले. तर याच फिरकीपटू अक्षर पटेलने 4 षटकांत 21 धावा देत 2 बळी घेतले. या सामन्यात कुलदीप यादव आणि इशांत शर्मालाही प्रत्येकी एक विकेट मिळाली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने आपल्या 144 धावांचा बचाव करताना हा सामना 7 धावांनी जिंकला. अखेरच्या षटकात मुकेश कुमारने घातक गोलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
संबंधित बातम्या