रवी शास्त्रींचा पुन्हा एकदा निवड समितीवर संताप, म्हणाले ‘निवड बैठकीचे प्रसारण करा’

भारतीय क्रिकेट संघातील निवडीबाबत अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी अनेकदा केली जाते. पण गेल्या काही काळापासून टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे निवडकर्त्यांवर सतत हल्लाबोल करत आहेत. आता आपल्या नव्या वक्तव्यात त्यांनी संघ निवड बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी उचलून धरली आहे. यामुळे पारदर्शकतेबरोबरच मंडळाच्या महसुलातही वाढ होईल, असे शास्त्री यांचे म्हणणे आहे.

60 वर्षांचे रवी शास्त्री espncricinfo यांच्याशी खास संवाद साधताना ते म्हणाले, “लाइव्ह निवड बैठक पाहणे हे माझे स्वप्न आहे. जेव्हा निवड बैठक होईल, तेव्हा तुम्ही बॉक्स ऑफिसची (पैसा) कल्पना देखील करू शकता. यामुळे निवडकर्त्याची जबाबदारीही वाढेल. जर तुम्हाला पारदर्शकता हवी असेल तर हे केलेच पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, “ते प्रसारणाचे अधिकारही विकू शकतात. हे का होऊ शकत नाही? जर महसूल आला तर निवडकर्त्यांना पाचपट जास्त पैसेही मिळू शकतात.

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या वादग्रस्त स्टिंग ऑपरेशननंतर टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी भारताचे माजी सलामीवीर शिव सुंदर दास सध्या निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष आहेत.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ड्रीम 11 टीम – व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *