वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, अनुभवी वेगवान गोलंदाज जखमी

सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू आहे. आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023) च्या फायनलसाठी तयारी सुरू करेल. 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल येथे अंतिम सामना खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंजत आहे. उमेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रतिष्ठेच्या मालिकेच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो.

उमेश यादव आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात उमेश यादवला दुखापत झाली होती. यानंतर त्याला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातून बाहेर बसावे लागले. उमेश यादव आयपीएल 2023 च्या आगामी सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळेल की नाही हे सध्या स्पष्ट नाही, परंतु तो दुखापतीतून बरा झाल्यास तो कोलकाता नाईट रायडर्सच्या जर्सीत दिसू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *