विराट कोहली आणि रोहित शर्माची टी-20 कारकीर्द संपली का?

टीम इंडियाने 2007 पासून टी-20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. गेल्या टी-20 विश्वचषकातही टीम इंडियाची कामगिरी चांगली नव्हती. अशा स्थितीत माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात अनेक नव्या चेहऱ्यांची अपेक्षा आहे.

रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य करताना या स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार असणार्‍या खेळाडूचे नाव सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या टी-20 करिअरवरही मोठे वक्तव्य केले आहे.

रवी शास्त्री म्हणाले, “टी20 विश्वचषक येत आहे आणि तरुणांमध्ये खूप प्रतिभा आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये आम्ही काही महान प्रतिभा पाहिल्या आहेत. हा संघ पूर्णपणे नवीन नसून त्यात अनेक नवे चेहरे असतील. हार्दिक पांड्या आधीच या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे.

तो पुढे म्हणाला, “जर फिटनेसची समस्या नसेल तर तो संघाचे नेतृत्व करत राहील. पांड्या हा २०२२ च्या टी२० विश्वचषकातील भारतीय टी२० संघाचा कर्णधार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टी-20 संघात स्थान मिळालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *