न्यूझीलंड (NZ) कर्णधार केन विल्यमसन यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामात गुजरात टायटन्स (GT) कडून खेळत होता, परंतु IPL 2023 हंगामातील पहिल्याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना विल्यमसनच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याने लगेचच आयपीएलमधून माघार घेतली. त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशनही झाले होते, त्यामुळे तो भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळू शकत नाही.
आता मिळालेल्या माहितीनुसार कर्णधार केन विल्यमसन न्यूझीलंड विश्वचषक संघासह भारतात दाखल होणार आहे. केन विल्यमसनला मार्गदर्शक म्हणून संघासोबत ठेवण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड अजूनही केन विल्यमसन विश्वचषकात खेळण्याबाबत आशावादी आहेत.
CSK विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळताना केन विल्यमसनला उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर विल्यमसन भारत सोडून मायदेशी परतला. यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांचे पुनर्वसन सुरू आहे.
दरम्यान, पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक स्टीड म्हणाले, “विल्यमसन विश्वचषक खेळणार याविषयी आम्ही आत्ताच काही सांगू शकत नाही. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि आता आपण म्हणू शकतो की शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सध्या तो पुनर्वसनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
संबंधित बातम्या