विश्वचषक 2023: आयसीसीने पात्रता फेरीचे वेळापत्रक जाहीर केले, श्रीलंका-वेस्ट इंडिजचा वेगवेगळ्या गटात समावेश

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेट विश्वचषक २०२३ पात्रता फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तीन आठवडे चालणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी आयसीसीने जाहीर केले.

त्यानुसार अ गटात वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, नेदरलँड, नेपाळ आणि अमेरिका या संघांचा समावेश करण्यात आला आहे. ब गटात श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि यूएई यांचा समावेश आहे.

18 जून ते 9 जुलै या कालावधीत झिम्बाब्वे येथे होणार्‍या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीसाठी दोन वेळचे विजेते वेस्ट इंडिज आणि 1996 ची चॅम्पियन श्रीलंका यांना वेगळ्या गटात सोडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *