‘शतकाला उत्तर’, कोहलीच्या शतकामुळे आरसीबीने एसआरएचला हरवले, प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम

सनरायझर्स हैदराबादच्या हेनरिक क्लासेनने शतक झळकावले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 187 धावांचे आव्हान दिले, मात्र क्लासेनच्या या शतकाला विराट कोहलीनेही चोख प्रत्युत्तर दिले. कोहलीने 63 चेंडूत शतक ठोकले, या जोरावर आरसीबीने हैदराबादचे 187 धावांचे आव्हान 19.2 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. आरसीबीकडून फाफ डू प्लेसिसने 71 धावा केल्या. या दोघांनी 172 धावांची दमदार सलामी दिली.

विराट कोहलीने मोसमातील पहिले शतक झळकावले. आयपीएलच्या इतिहासातील हे त्याचे सहावे शतक आहे. त्याने ख्रिस गेलच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

पॉइंट टेबलनुसार आजचा सामना आरसीबीने जिंकला असून त्याच्या गुणांची संख्या १४ झाली आहे. त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आणि मुंबई इंडियन्सला पाचव्या स्थानावर ढकलले. प्ले-ऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी आरसीबीला गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकावा लागेल.

अपडेट चालू आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *