IPL मधून बाहेर झाल्यानंतर विराट कोहलीने तोडले मौन, शुभमन गिलचीही प्रतिक्रिया

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विराट कोहलीनेही शतक झळकावले, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच्या शतकासमोर शुभमन गिलचे शतक अधिक प्रभावी ठरले. आता टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर विराटने चाहत्यांसाठी पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे.

34 वर्षीय विराट कोहलीने आरसीबीच्या चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल अतिशय भावूकपणे आभार मानले. त्याने लिहिले, “क्षणांनी भरलेला हंगाम पण दुर्दैवाने आम्ही आमच्या लक्ष्यापासून कमी पडलो. निराश झालो, परंतु आपण आपले डोके उंच धरले पाहिजे, आमच्या निष्ठावंत समर्थकांचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. ”

त्याने पुढे लिहिले, “सर्व प्रशिक्षक, संघ व्यवस्थापन आणि माझ्या सहकाऱ्यांचे खूप खूप आभार. पुढच्या वेळी आणखी मजबूत होण्याचे आमचे ध्येय आहे.”

विराटने ही पोस्ट सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. त्याचवेळी शुभमन गिलने इंस्टाग्रामवर या पोस्टवर क्राउन इमोजीवर कमेंट केली आहे. याचा अर्थ तो विराट कोहलीला राजा म्हणून संबोधत आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ड्रीम11 टीम – व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *