जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर बुधवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या आवृत्तीच्या 26व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सचा 10 धावांनी पराभव केला.
राजस्थानला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती, परंतु लखनौचा वेगवान गोलंदाज आवेश खानने शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या षटकात त्याने केवळ 8 धावा दिल्या आणि दोन मोठ्या विकेट्स घेतल्या. यासह आणखी एका भारतीय वेगवान गोलंदाजाने आयपीएलमधील सामन्याच्या शेवटच्या षटकात धावांचा बचाव करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
याआधी मंगळवारी मुंबई इंडियन्सचा युवा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या षटकात केवळ 5 धावा देत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. यादरम्यान SRH ला सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज होती. अर्जुनने केवळ सामना जिंकला नाही, तर त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात पहिली विकेटही मिळवली.
अपडेट प्रगतीपथावर आहे,
संबंधित बातम्या