इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये 70 सामने झाले आहेत आणि चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्लेऑफमध्ये गेले आहेत. आता या मोसमाचा अंतिम सामना २८ मे रोजी होणार आहे. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे पुढील लक्ष्य हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल हे असेल.
भारताला ७ जूनपासून ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा असून भारतीय संघातील काही खेळाडू मंगळवारी लंडनला रवाना होणार आहेत. विराट कोहली, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि आर अश्विन हे खेळाडू मंगळवारी लंडनला रवाना होणार आहेत. या खेळाडूंचा आयपीएलमधील प्रवास आता संपला आहे.
दुसरीकडे, रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचली आहे आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अंतिम सामन्याच्या एका दिवसानंतर म्हणजे 29 मे रोजी लंडनला रवाना होऊ शकतो आणि उर्वरित संघ देखील त्याच्यासोबत जाईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियासोबत तीन नेट गोलंदाज असतील, त्यात अंकित चौधरी, आकाशदीप आणि यारा पृथ्वीराज यांचा समावेश आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
पहिल्या सत्रात भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे होते. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मागील चुकांची पुनरावृत्ती न करता चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बीसीसीआय टीम इंडियाला सराव सामने खेळवण्याचाही प्रयत्न करत आहे.
संबंधित बातम्या