WTC फायनल: टीम इंडियात मोठा बदल! आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंची लॉटरी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना ७ जूनपासून इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. आता या सामन्यासाठी भारतीय संघात एका मोठ्या बदलाची बातमी समोर आली आहे.

टीम इंडियाच्या एका वरिष्ठ खेळाडूला दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली. दुसरीकडे युवा खेळाडूची लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने सोमवारी संध्याकाळी ट्विट करून याबाबत माहिती दिली. याशिवाय बोर्डाने तीन स्टँडबाय खेळाडूंची नावेही जाहीर केली आहेत.

बीसीसीआयनुसार, केएल राहुलच्या जागी ईशान किशनचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर मुकेश कुमार, रुतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव यांना स्टँडबाय म्हणून निवडण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर गायकवाड जबरदस्त फॉर्मात आहे.

खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादवला बॉर्डर बावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एक कसोटी खेळल्यानंतर वगळण्यात आले. वनडेतही त्याला लय सापडली नाही. आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये तो फ्लॉप झाला, पण नंतर जोरदार पुनरागमन केले. या दोघांची आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती.

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल 2023 मधील सामन्यादरम्यान जखमी झाला आणि संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. राहुलच्या मांडीला दुखापत झाल्याची बातमी होती. यानंतर त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही आपले नाव मागे घेतले. बीसीसीआयने आता त्याची अधिकृत माहिती देताना त्याच्या बदलीची माहिती दिली आहे. त्याचवेळी जयदेव उनाडकट दुखापतग्रस्त असूनही संघात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *