इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या 53 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने पंजाब किंग्ज (PBKS) चा 5 विकेट्सने पराभव केला. नितीश राणाच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने या विजयासह प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने सात गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या, प्रत्युत्तरात कोलकाताने शेवटच्या चेंडूवर पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सचे 11 सामन्यांत 10 गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर पंजाब 11 सामन्यांत 10 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
या सामन्यात पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्याचवेळी वरुण चक्रवर्तीने तीन आणि हर्षित राणाने दोन गडी बाद केले. कोलकाता नाईट रायडर्सकडून नितीश राणाने 51 आणि आंद्रे रसेलने 42 धावा केल्या. पंजाबकडून राहुल चहरने दोन बळी घेतले.
कोलकाता नाईट रायडर्सच्या या शानदार विजयानंतर चाहते आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. या सामन्यातील टॉप-10 ट्रेंडिंग मीम्स जाणून घेऊया –
संबंधित बातम्या