पाकिस्तानच्या स्टार वेगवान गोलंदाजाची इंग्लंड संघाशी करार, खेळाडू सोडणार देश

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जमान खानने इंग्लिश कौंटी संघ डर्बीशायरशी करार केला असून, त्यानंतर तो टी-20 ब्लास्टमध्ये भाग घेणार आहे. जमान खान या महिन्याच्या अखेरीस डर्बीशायर संघात सामील होणार आहे.

या संदर्भात डर्बीशायर काउंटीचे प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणतात की, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जमान खान हा अतिशय गुणवान गोलंदाज आहे.

जमान हा पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये लाहोर कलंदरचे प्रतिनिधित्व करतो, क्रिकेटरला डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणूनही ओळखले जाते. पीएसएलमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर या वेगवान गोलंदाजाने यावर्षी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी राष्ट्रीय संघात पदार्पण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *