CSK मुख्य प्रशिक्षकाने MS धोनीच्या निवृत्तीबद्दल दिले मोठे अपडेट, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

अनेक चाहते आणि मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की महान भारतीय कर्णधार एमएस धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. पण आता चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल एक मोठा अपडेट दिला आहे, जे जाणून सर्व चाहत्यांना आनंद होईल.

खरं तर, पत्रकारांनी फ्लेमिंगला विचारलं की धोनी या मोसमानंतर निवृत्ती घेणार का? तर उत्तरात तो म्हणाला, “नाही, त्याने अजून असे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.”

खुद्द धोनीनेही निवृत्तीबाबत स्पष्टपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र, आपण करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे धोनीने म्हटले आहे. पण आता स्टीफन फ्लेमिंगच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यांना आशा आहे की धोनी आणखी काही सीझन मैदानावर खेळताना दिसेल.

MS Dhoni चे वय किती आहे?

४१ वर्षे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *