IPL 2023, DC vs LSG: दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या तिसऱ्या सामन्यात शनिवारी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) चे संघ आमनेसामने आहेत. लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसातील हा दुसरा सामना आहे.

हे पण वाचा | आयपीएलमध्ये भोजपुरी भाषेची क्रेझ, देसी कॉमेंट्री ऐकून चाहते झाले वेडे

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, मार्क वुड, जयंत यादव, रवी बिश्नोई, आवेश खान.

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (क), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिले रुसो, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार.

लखनौने काइल मेयर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस आणि मार्क वुड या चार परदेशी खेळाडूंना ठेवले आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्समध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नरशिवाय मिचेल मार्श, रिले रुसो आणि रोव्हमन पॉवेल हे परदेशी खेळाडू आहेत.

हे पण वाचा | IPL 2023, PBKS vs KKR: आंद्रे रसेल नाइट रायडर्ससाठी 2000 धावा पूर्ण करण्यासाठी सज्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *