IPL 2023, GT vs CSK, सामना-1: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या आवृत्तीचा पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटनाचा सामना होत आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.

हेही वाचा – आयपीएल 2023: जिओने अनेक परवडणाऱ्या क्रिकेट योजना लाँच केल्या, चाहत्यांची उत्सुकता वाढली

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन)संघ : डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (क), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगेरगेकर.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन)संघ : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ.

हेही वाचा – आयपीएल 2023 महाकुंभ आजपासून सुरू होणार, पहिल्या सामन्यात जीटीचा सामना सीएसकेशी

आयपीएल 2023 चा उद्घाटन सोहळा नाणेफेकीपूर्वी संपला. यामध्ये गायक अरिजित सिंगने आपल्या जादुई आवाजाने सर्वांना वेड लावले. अरिजीतने अनेक गाणी गायली. त्यांच्यानंतर तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदान्ना यांनी नृत्य सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *