IPL 2023: RCB ला मोठा धक्का, अनुभवी ऑस्ट्रेलियन खेळाडू संघाबाहेर

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या आवृत्तीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. मात्र याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) मोठा धक्का बसला आहे. खरं तर, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

हे पण वाचा , स्टीव्ह स्मिथच्या मते IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचतील हे जाणून घ्या?

32 वर्षीय जोश हेझलवुड ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये एकही सामना खेळला नाही. मात्र, हेजलवुड आरसीबीसाठी स्पर्धेतील अर्धे सामने खेळू शकेल, अशी अपेक्षा आहे. मात्र यासाठी तो प्रथम क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सल्ला घेणार आहे.

एवढेच नाही तर अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यालाही मुकावे लागू शकते, कारण तो अद्याप त्याच्या पायाच्या दुखापतीतून सावरलेला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मॅक्सवेलचा पाय फ्रॅक्चर झाला होता.

हे पण वाचा , विराट कोहलीचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न यंदाच्या मोसमात पूर्ण होईल – संजय मांजरेकर

IPL 2023 चा पहिला सामना गतविजेते गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 31 मार्च रोजी होणार आहे. त्याचवेळी RCB 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

KL राहुलची टीम IPL मध्ये रचणार नवा इतिहास – VIDEO

IPL 2023 मध्ये RCB चे नेतृत्व कोण करणार?

फाफ डु प्लेसिस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *