KKR ला मोठा झटका, आणखी एक परदेशी खेळाडू IPL सोडून मायदेशी परतला

कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टिरक्षक लिटन दासने हंगामाच्या मध्यभागी संघ सोडण्याचा निर्णय घेतला आणि 28 एप्रिल रोजी बांगलादेशला परतला. कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे लिटन दासने हा निर्णय घेतला असून आता तो या मोसमातील पुढील सामन्यांमध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. केकेआर संघ व्यवस्थापनाने या वृत्ताला दुजोरा दिला असून या मोसमात त्याच्या पुढील खेळाबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

लिटन दास बांगलादेशला परतला

KKR कडून अधिकृत निवेदन जारी करताना असे म्हटले आहे की लिटन दास बांगलादेशला त्याच्या कुटुंबाला आलेल्या वैद्यकीय आणीबाणीमुळे परत आला आहे आणि आम्ही त्याला आणि त्याच्या कुटुंबाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. लिटन दासच्या जाण्यानंतर केकेआर संघात केवळ बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान उरला आहे. यापूर्वी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले होते.

लिटन दासची टी20 कारकीर्द

लिटन दासने आपल्या कारकिर्दीत 180 टी-20 सामन्यांमध्ये 4055 धावा केल्या आहेत, तसेच यष्टिरक्षक म्हणून त्याने 90 झेल आणि 26 स्टंपिंग केले आहेत. त्याला केकेआरने प्रथमच आयपीएलमध्ये ५० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते आणि या मोसमात तो केकेआरसाठी एकच सामना खेळू शकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *