‘RCB सारखा संघ नसेल तर IPL कंटाळवाणा वाटतो’, MI vs RCB सामन्याचे टॉप-10 ट्रेंडिंग मीम्स

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आरसीबीने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्सने पहिल्या षटकापासून त्यांची धावांची सरासरी प्रति षटक 10 धावांच्या आसपास ठेवली, त्यामुळे मुंबईने आरसीबीने दिलेले 200 धावांचे आव्हान 17 व्या षटकात पार केले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 83* धावा केल्या. त्याने 237.14 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि मुंबईला महत्त्वपूर्ण सामना जिंकण्यास मदत केली. नेहल वढेरानेही 52* धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले.

हेही वाचा – WTC फायनल 2023 साठी संघ निवडण्यात BCCI ने केली मोठी चूक! या खेळाडूच्या निवडीवरून गदारोळ झाला

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले होते. ग्लेन मॅक्सवेल (66) आणि फाफ डू प्लेसिस (65) मुंबई विरुद्ध 120 धावांची तुफानी भागीदारी केली. दिनेश कार्तिकने स्लॉग ओव्हरमध्ये 17 चेंडूत 30 धावा करत आरसीबीला 200 धावांच्या जवळ नेले. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने 36 धावांत 3 बळी घेतले.

हे पण वाचा | आयपीएल 2023: मार्क वुडने लखनौ सुपर जायंट्सला मध्यंतरी सोडले

मुंबई इंडियन्सच्या या शानदार विजयानंतर चाहते आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. सामन्याचे टॉप-10 ट्रेंडिंग मीम्स पहा.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ड्रीम 11 टीम | CSK vs DC ड्रीम टीम अंदाज | आयपीएल 2023 |

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *